Posts

Showing posts from November, 2022

मुंबई-ठाण्यादरम्यान नवी चित्रनगरी! ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Image
  मुंबई :   गोरेगाव येथील चित्रनगरीप्रमाणेच मुंबई आणि ठाण्यादरम्यान नवी चित्रनगरी उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे  यांनी बुधवारी सांगितले. महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि वासिम कुरेशी निर्मित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या नव्या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष  राज ठाकरे  यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. गेले काही दिवस सातत्याने राज ठाकरे आणि आपल्यातील भेटीगाठी वाढत असल्याची कबुली देत गेल्या दहा वर्षांतील कसर आपण भरून काढत असल्याची मिश्कील टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. या वर्षभरात छत्रपती शिवाजी महाराजांची कर्तृत्वगाथा सांगणारे अनेक मराठी ऐतिहासिकपट प्रेक्षकांनी अनुभवले आहेत. याच ऐतिहासिकपटांच्या लाटेतील ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या नव्या चित्रपटाची घोषणा एका भव्य समारंभात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते नारळ वाढवून पारंपरिक पद्धतीने चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उदय सामंत आणि प्रताप सरनाईकही कार्यक्रमाला उपस्थित होते. Image Source एकाच व्य...